Ad will apear here
Next
‘राज सन्मान करंडका’चे पारितोषिक वितरण २८ जानेवारीला
पुणे : ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कोथरूड विभागातर्फे आयोजित केलेल्या ‘राज सन्मान करंडक २०१९’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे पारितोषिक वितरण २८ जानेवारी २०१९ रोजी दिग्दर्शक गजेंद्र अहिरे व निपुण धर्माधिकारी यांच्या हस्ते कोथरूड येथील यशवंराव चव्हाण नाट्यगृहात करण्यात येणार आहे,’ अशी माहिती स्पर्धेचे आयोजक आणि मनसे कोथरूड विभागाचे अध्यक्ष शशांक अमराळे यांनी दिली.

स्पर्धेची प्राथमिक फेरी नुकतीच पार पडली. त्यातील उत्कृष्ट एकांकिकांची अंतिम लढत २८ जानेवारीला होणार असून, त्यातील विजेत्या संघाला रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. महाविद्यालयीन युवक-युवतींना आपले कलागुण सादर करता यावे आणि त्यांना व्यासपीठ मिळावे, हा स्पर्धेचा उद्देश असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZIZBW
Similar Posts
मनसेच्या शिक्षक सेनेचे शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेच्या वतीने १९ जुलै रोजी पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
मांज्यात अडकलेल्या कबुतराची नागरिकांकडून सुटका नाशिक : नाशिक-पुणे मार्गावरील बोधलेनगर येथे नायलॉन मांज्यात अडकलेल्या कबुतराची नागरिकांनी वेळीच सुटका केल्याने त्याचे प्राण वाचले.
पथनाट्यातून मांडल्या समस्या पुणे : शिक्षण क्षेत्रातील समस्या, तसेच सरकारच्या शैक्षणिक धोरणात आवश्यक असलेले बदल यांबद्दल जागृती करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (मनविसे) पुणे शहर शाखेने पथनाट्ये आयोजित केली होती. ‘मनविसे’ने केलेल्या कामाची आणि आंदोलनांची माहितीही त्यातून देण्यात आली.  पुणे शहरातील महाविद्यालये
मनसेच्या आस्थापना विभाग जिल्हाध्यक्षपदी जगदीश वाल्हेकर पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना विभागाच्या जिल्हाध्यक्ष तथा संघटकपदी जगदीश मारुती वाल्हेकर यांची निवड करण्यात आली आहे. रस्ते आस्थापना विभागाचे प्रदेशाध्यक्ष योगेश परुळेकर यांनी वाल्हेकर यांच्या निवडीचे पत्र दिले. या वेळी उपाध्यक्ष रावसाहेब कदम, सरचिटणीस योगेश चिले आदी मान्यवर उपस्थित होते

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language